डॉक्टरांना भ्रष्ट मार्गाने लुटण्याचे काम थांबवा – डॉ विवेक कोरडे

डॉक्टरांना भ्रष्ट मार्गाने लुटण्याचे काम थांबवा – डॉ विवेक कोरडे
मुंबई / रमेश औताडे
महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन ही वैधानिक संस्था इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिनच्या (बीएएमएस, बीयूएमएस आणि इतर ) डॉक्टर्सच्या व्यवसायाचे नियंत्रण करण्यासाठी निर्माण केली आहे. मात्र हि संस्था आपले स्वतःचे काम सोडून डॉक्टरांना भ्रष्ट मार्गाने लुटण्याचे काम करून एका खाजगी कंपनीचे उखळ पांढरे करत आहे. असा आरोप शिक्षण व्यापारीकरण विरोधी मंच चे संस्थापक अध्यक्ष डॉ. विवेक कोरडे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत शुक्रवारी केला.
कायद्यात कोणतीही तरतूद नसताना एम सी आय एम ने रजिस्ट्रेशन चे नूतनीकरण करताना दर पाच वर्षांनी ५० क्रेडिट पॉईंट अनिवार्य केले. शिवाय या ५० पैकी ३० क्रेडिट पॉईंट एकाच कंपनीने आयोजित केलेल्या ऑनलाईन सीएमई (निरंतर वैद्यकीय शिक्षण) मधून घेण्याचे बंधनकारक केले. कोणत्याही प्रकारचे टेंडर यासाठी न काढता एकाच कंपनीची नेमणूक यासाठी करून मक्तेदारी निर्माण केली. असा आरोप कोरडे यांनी यावेळी केला.
या कंपनीला आधी प्रत्येक ऑनलाइन सीएमइसाठी म्हणजे एका क्रेडिट पॉईंटसाठी मनमानी पणाने रु.११०० हा दर ठरवून दिला. नंतर तो स्वतःच प्रत्येक सीएम साठी रू. ६०० केला. आधी रु. ११०० ठरवल्यानंतर रु. ६०० का केला याचे कोणतेही स्पष्टीकरण एमसीआयएमकडे जाही. या संदर्भातल्या बैठकींचे वृत्तांत एमसीआयएमकडे नाहीत. टेंडर नोटीस न काढता तीन टेंडर कसे आले, याचेही स्पष्टीकरण एमसीआयएमकडे नाही. असे कोरडे म्हणाले.




