मराठी राजभाषा दिवस डी.एस. हायस्कूलमध्ये उत्साहात साजरा
मुंबई,दि.३:कवि कुसूमाग्रज वि.वा.शिरवाडकर यांचा जनमदिन मराठी राजभाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहात राज्य शासनाच्या करोनाविषयक नियमावलीचे काटेकोरपणे पालन करीत सायन येथील डी.एस. हायस्कूलमध्ये साजरा करण्यात आला याप्रसंगी प्रमुख पाहुणे होते ,डॉ. कोटणीस संशोधन संस्थेचे संचालक प्रा. हेमंत सामंत व पत्रकार मिलिंद आरोलकर , दीपप्रज्वलनाने व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनीं कुसुमाग्रजांवरील आपले वक्तृत्व व्यासपीठावर सादर केले . तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर यांनी मराठी भावगीते सादर केलीत त्यासं संगीतसाथ नयन मोरे यांनी दिली.
मराठी राजभाषा दिनानिमित्त आपले मनोगत व्यकत करताना प्रा. हेमंत सामंत म्हणाले की “साहित्याविषयीची नाळ सुटल्यामुळे आज मुलांनमध्ये अकाली प्रौढत्व आलेल पहावयास मिळत. परंतु ग्रामीण भागात आज ही मराठी भाषा टिकून आहे . त्यामुळे येथील नऊ कोटी जनांमध्ये मराठी भाषा टिकून राहणारच.” असा सकारात्मक आशावाद याठिकाणी व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या प्रमुख सौ.संध्या सावंत होत्या तर सूत्रसंचालन सौ.अनघा भिवंडकर यांनी केले प्रास्ताविक सौ.नयना लोखंडे यांनी केले प्रमुख पाहुण्यांचा परीचय सौ.मनिषा कडव यांनी करवून दिला . शाळेचे मुख्याध्यापक व्ही.एम. सरवळे , पर्यवेक्षिका सौ.खरे ,सौ.गायकवाड ,सौ कल्पना पाटील., श्री. ढेकळे यांचे व शाळेच्या कार्यकारी सदस्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला .