ब्रेकिंग
मोठी बातमी, राज्यमंत्री बच्चू कडू यांना २ महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

अमरावती:- राज्यमंत्री बच्चू कडू यांना २ महिने सक्षम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.मुंबईतल्या फ्लॅटची माहिती लपवल्याने बच्चू कडू यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रात ही माहिती लपवण्यात आल्याचं सांगत अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी २०१७ मध्ये बच्चू कडू यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.यावर निकाल देत चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने राज्यमंत्री बच्चू कडू यांना २ महिने सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
सोबतच न्यायालयाने राज्यमंत्री बच्चू कडू यांना २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.दरम्यान आता यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची शक्यता आहे.