चिंता वाढली! राज्यात दिवसभरात १८ हजार ४६६ नवीन कोरोनाबाधित

मुंबई- कोरोनाने गेल्या २ वर्षांपासून संपूर्ण जगात धुमाकुळ घातला आहे.अश्यातच आपल्या राज्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट आल्याचे दिसत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. शिवाय, ओमायक्रॉन बाधित रूग्ण संख्येतही भर पडतच आहे.
रूग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्याची वेळ येते की काय अशी देखील भीती आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात १८ हजार ४६६ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून, ओमायक्रॉनच्या ७५ रूग्णांची सुद्धा नोंद झाली आहे. याशिवाय २० कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याचे देखील समोर आले आहे.
तसेच, आज राज्यात ४ हजार ५५८ रुग्ण कोरोनामुक्त देखील झाले आहेत. यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण ६५,१८,९१६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८६ टक्के एवढे झाले आहे.
ही आहे मुंबईतील कोरोना परिस्थिती
राज्यासह मुंबईमधील कोरोना परिस्थिती चिंतेचा विषय बनत आहे.आज दिवसभरात मुंबईत ४०८ नवीन ओमायक्रॉनबाधित रूग्ण आढळले असून कालच्या तुलनेत आज रूग्णसंख्या वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.





