धक्कादायक! राज्यातील सुमारे २४ हजार ५७९ महिला बेपत्ता

मुंबई- नॅशनल क्राईम रेकाँर्ड ब्युरोच्या अहवालातील २०२० अखेरपर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील सुमारे २४ हजार ५७९ महिला बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील वाढत्या महिलांवरील लैंगिक अत्याचारांसह विविध कारणांमुळे या महिला बेपत्ता झाल्याची माहिती आहे.
राज्यातील ६३ हजार २५२ बेपत्ता महिलांपैकी ४० हजार ९५ महिला सापडल्या आहेत. तर ४ हजार ५१७ बेपत्ता अल्पवयीन मुलींपैकी ३ हजार ९५ अल्पवयीन मुली सापडल्याची माहिती नॅशनल क्राईम रेकाँर्ड ब्युरोच्या अहवालात देण्यात आली.
या सर्वांवर आणि वाढत्या महिलांवरील लैंगिक अत्याचारांवर गृहविभागाला विचारले असता, ‘महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्हयांमधील आरोपींना शिक्षा होण्याच्या दृष्टीने कायदे कडक करण्यात येत आहेत. बलात्काराच्या गुन्ह्यांचा दोन महिन्याच्या आत तपास करणे चौकशी अधिकार्यांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे’,अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लेखी प्रश्नोत्तराद्वारे दिली आहे.