केंद्राची कोरोना रूग्णांसाठी नवी नियमावली ; फक्त ३ दिवसात कोरोना रूग्णांना मिळणार डिस्जार्च

नवी दिल्ली- दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अश्यात देशातील वाढत्या कोरोना आणि ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या आरोग्य विभागाने बाधित रूग्णाला किती दिवस रूग्णालयात ठेवायचे आणि किती दिवसानंतर डिस्जार्च द्यायचा यासंदर्भात नवी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार आता फक्त तीन दिवसात रूग्णाला डिस्जार्च देण्यास सांगण्यात आले आहे.
डिसेंबर २०२१ अखेरीस पासून देशभरातील जवळपास सर्वच राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वच राज्यांमध्ये या दोन्ही विषाणूबाधित रूग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. परंतु यातील अनेक रूग्ण हे सौम्य लक्षणे असलेले किंवा लक्षणे विरहीत असल्याचे आढळून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने आपल्या क्लिनिकल मॅनेजमेंट नियमांमध्ये पुन्हा सुधारणा केली आहे.
या नव्या सुधारीत नियमानुसार आता गृह विलगीकरणात राहणारे आणि रूग्णालयात दाखल असलेल्या रूग्णांना तीन दिवसात जर कोणतीही लक्षणे दिसत नसतील तर आणि लक्षणांचे ९३ टक्के सॅच्युरेशन झाले असेल तर अशा रूग्णांना ३ दिवसात डिस्जार्च देण्याचा नवा नियम केंद्रीय आरोग्य विभागाने केला आहे.