गोरेगाव मिररमुंबई

महालसीकरण: दिंडोशीत ३५०० नागरिकांचे मोफत लसीकरण!

मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, आ.सुनील प्रभु व रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पीटल यांची मोहिम..

मुंबई: कोरोना या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष लसीकरण मोहीमेचे आवाहन केले असून, नागरिकांनी जास्तीतजास्त संख्येने सहभागी होण्याची विनंती केली आहे. दिंडोशी विधानसभा क्षेत्रात शिवसेना नेते, पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टार मंत्री तथा पालकमंत्री मुंबई उपनगर जिल्हा आदित्य ठाकरे यांच्या विशेष प्रयत्नांने व सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पीटलच्या सहकार्याने दिंडोशी विधानसभा क्षेत्रात काल  दि . १५ ऑगस्ट , २०२१ रोजी सकाळी ९ ते सायं ५ वा. पर्यंत सेंट फ्रान्सीस हायस्कूल, लक्ष्मण नगर, कुरारगाव, मालाड ( पू ) , मुंबई -९ ७ येथे कोविड प्रतिबंधक मोफत महालसीकरण सोहळा मुख्य प्रतोद, आमदार, माजी महापौर मुंबई सुनिल प्रभु यांनी आयोजित केला.

या लसीकरण सोहळ्यात दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील ३५०० नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात आले. या लसीकरण सोहळ्याला शिवसेना सचिव सूरज चव्हाण, युवासेना सरचिटणीस अमोल किर्तीकर आणि युवासेनेचे संजय मशीलकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

या लसीकरण सोहळ्याला शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर, मुख्य प्रतोद, आमदार, माजी महापौर मुंबई सुनिल प्रभु, उपमहापौर सुहास वाडकर, विभाग संघटक, नगरसेविका साधना माने, विधानसभा संघटक विष्णू सावंत, प्रशांत कदम, पूजा चौहान, रीना सुर्वे, उपविभाग प्रमुख सुनिल गुजर, प्रदिप निकम, गणपत वरिसे, भाई परब, ऋचीता आरोसकर, वृंदा पालेकर, विद्या गावडे, सानिका शिरगावकर, नगरसेवक तुळशीराम शिंदे, आत्माराम चाचे, विनया विष्णू सावंत, युवासेना सरचिटणीस अमोल किर्तीकर, युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभु, रुपेश कदम, युवासेनेचे संजय मशिलकर, महिला व पुरुष शाखा प्रमुख, युवासेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!