ब्रेकिंग

चिंता वाढली!राज्यात आज दिवसभरात ३६ हजार २६५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

iमुंबई –राज्याच्या आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडत चालली आहे.कारण राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आज ३५ हजारांच्या पुढे गेला आहे. गेल्या २ वर्षांपासून कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे.अश्यातच आपल्या राज्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट आल्याचे चित्र दिसत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. शिवाय, ओमायक्रॉन बाधित रूग्ण संख्येतही भर पडत आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल ३६ हजार २६५ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे राज्याच आजपर्यंत करोनाची बाधा झालेल्या व्यक्तींची संख्या आता ६७ लाख ९३ हजार २९७ इतकी झाली आहे.

राज्यात आज ३६ हजारांहून जास्त बाधितांची नव्याने भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता १ लाख १४ हजार ८४७ इतकी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ७९ हजार २६० रुग्ण एकट्या मुंबईत आहेत.

मुंबईतील कोरोना परिस्थिती-
राज्यासह मुंबईमधील कोरोना परिस्थिती चिंतेचा विषय बनत आहे.आज दिवसभरात मुंबईत १९७८० नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून कालच्या तुलनेत आज रूग्णसंख्या वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.तर दिवसभरात मुंबईत ५६५ ओमायक्रॉन बाधित रूग्ण आढळले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!