मुंबईकरांच्या निरोगी फुप्फुसासाठी ४० लाख वृक्षांची गरज
अन्यथा पाठीवर ऑक्सीजन सिलेंडर घेऊन फिरावे लागेल

मुंबई / रमेश औताडे
महानगराच्या वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, शहराचे “फुप्फुस” समजले जाणारे हरितक्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण अभ्यासक अज्ञान रिसर्च व एज्युकेशन ट्रस्ट चे अध्यक्ष रिपाइं चे पर्यावरण विभाग मुंबई प्रदेश अध्यक्ष विजया शेट्टी यांनी मुंबईच्या पर्यावरणीय संतुलनासाठी किमान ४० लाख झाडे लावण्याची तातडीची गरज असल्याची माहिती दिली आहे.
मुंबईतील वाढते वाहनांचे धूर, बांधकाम प्रकल्पांमधील धूळ आणि कमी होत चाललेली झाडे यामुळे हवेतील प्रदूषण पातळी सतत वाढत आहे. यामुळे श्वसनविकार, दमा, आणि ऍलर्जीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. पर्यावरण कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, एका प्रौढ झाडामुळे दरवर्षी साधारणपणे ४८ पौंड कार्बन डायऑक्साइड शोषला जातो आणि शहरातील हवेचा दर्जा राखण्यासाठी झाडांची भूमिका महत्त्वाची आहे.
मोनो, मेट्रो, भुयारी रेल्वे, उंच गगनचुंबी इमारती, उड्डाण पूल असा आडवा उभा विकास होत असताना मुंबई सिमेंट फॅक्टरी झाली आहे. सर्वात जास्त महसूल मुंबई कडून देशाला मिळतो. सांताक्रुज येथील हवामान अंदाज सांगितला जातो मात्र इतर उपनगरात किती गर्मी आहे याचा अंदाज सांगितला जात नाही. मुंबईत पूर्वी ८६ पेक्षा जास्त उद्यान होती त्यापैकी ३२ पेक्षा कमी उद्याने मुंबई शिल्लक राहिली आहेत. मुंबईकरांना जो पाणीपुरवठा होतो त्याचे जर सूक्ष्मदर्शका खाली तपासणी केली तर भयंकर वास्तवसमोर येईल. सामान्य मुंबईकरांचे आरोग्य पाण्यामुळेच बिघडत आहे. मुंबईत उंदीरांचा सुळसुळाट झाला असून हॉस्पिटल मधील रुग्णही वैतागले आहेत. असे विजय शेट्टी यांनी सांगितले.






