दिलासादायक! राज्यात आणि मुंबईत कोरोना रूग्णसंख्येत घट

मुंबई :- कालच्या तुलनेत आज राज्यातील कोरोना बाधितांच्या रूग्णसंख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाच्या ४६ हजार ३९३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.तर राज्यात गेल्या २४ तासात ३०७९५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. काल राज्यात कोरोनाच्या ४८ हजार २७० रुग्णांची नोंद झाली होती म्हणजे आज कालच्या पेक्षा दीड हजाराने रुग्ण संख्या कमी झाली आहे.
राज्यात आज ४१६ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत २७५९ ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी १२२५ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.मुंबईतील कोरोना परिस्थिती दिलासादायक असून कालच्या तुलनेत तब्बल १५०० ने घट झाली आहे.
मागील २४ तासांत मुंबईत ३५६८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर २३१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मागील २४ तासांत मुंबईत १० जणांचा कोरोनावरील उपचार घेताना मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या १६ हजार ५२२ झाली आहे. तर २३१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट ९६ टक्के इतका आहे.