महाराष्ट्र हळहळला! वाढदिवसाची पार्टी करून परतताना भीषण अपघात,मेडिकल कॉलेजच्या ७ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू,पंतप्रधान मोदींनी जाहीर केली प्रत्येकी २ लाखांची मदत

वर्धा:- वर्धा जिल्ह्यातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. वर्धा देवळी मार्गावरील सेलसुरा इथं काल रात्री दीडच्या सुमारास झालेल्या अपघातात मेडिकल कॉलेजच्या सात तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. वाढदिवसाची पार्टी करून माघारी परतत असताना हा भीषण अपघात झाल्याचा समोर आलं आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे.
या घटनेची माहिती समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना तसेच जखमींना मदत जाहीर केली आहे. आपल्या ट्विटरवरुन ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय मदत निधीतून सेलसुराजवळ झालेल्या अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की, संबंधित झायलो गाडी दुभाजकाला धडकून पुलावरून खाली कोसळली. यात गाडीत बसलेल्या सर्वांचा जागीच मृत्यू झाला सोबतच या गाडीत असलेल्या सर्व साहित्यांचाही चेंदामेंदा झाला आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून ठिक-ठिकाणी हळहळ व्यक्त केली जात आहे.