केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर,शिर्डीच्या साई बाबांचं दर्शन घेऊन करणार महाराष्ट्र दौऱ्याचा शुभारंभ

मुंबई:- देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उद्या म्हणजेच १८ डिसेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत.केंद्रीय मंत्री गृहमंत्री पदाबरोबरच केंद्रीय सहकारमंत्री पदही त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे उद्या होत असलेल्या महाराष्ट्रातील प्रवरानगर येथील सहकार परिषदेत ते स्वतः उपस्थित राहणार आहेत.भाजपा आमदार राधाकृष्ण विखेपाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी या परिषदेचे आयोजन केले आहे.
या दौऱ्याची सुरुवात अमित शाह शिर्डी येथील साई बाबांच्या दर्शनाने करणार आहेत. केंद्रीय मंत्री अमित शाह एकूणच दोन दिवसीय महाराष्ट्र दौरा करणार आहेत. पहिल्यादिवशी ते शिर्डीमध्ये सहकार परिषदेमध्ये सामील होणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी ते पुणे येथे ते भेट देणार आहेत.
अमित शाह उद्या उपस्थित राहत असलेल्या सहकार परिषदेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.उद्या अमित शाह काय महत्वाच्या घोषणा करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.या परिषदेमध्ये सहकार क्षेत्रातील विविध तज्ञ मंडळी देखील उपस्थित राहणार आहेत.दरम्यान महाराष्ट्रातील सहकार चळवळ मजबूत करणाऱ्या शरद पवारांना या परिषदेचे अद्याप निमंत्रण नसल्याचे समोर आले आहे.त्यामुळे आयत्या वेळेस पवारांना निमंत्रण जाईल का? आणि शरद पवार या परिषदेला उपस्थित राहणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे..