ब्रेकिंग
राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत घट,वाचा आजची संख्या

मुंबई :- राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आज काहीशी कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाच्या १५ हजार २५२ नव्या रुग्णांची भर पडली असून ७५ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या २४ तासात ३० हजार २३५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली नाही.आतापर्यंत ३३३४ ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी १७०१ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
मुंबईतील कोरोना परिस्थिती-
गुरुवारी मुंबईत ८२७ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर १३६६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १०,२२,२९२ इतकी झाली आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट ९७ टक्केंवर पोहचला आहे.