
रत्नागिरी दि.21 (प्रतिनिधी) शहरातील सावरकर नाट्यगृहाच्या गैरसाई बाबत वेळोवेळी आवाज उठून देखील प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही आता हे नाट्यगृह केवळ राजकीय लोकांच्या सभा व शासनाचे कार्यक्रम राबवण्यासाठी उरले आहे नाट्यगृहात एसी व साऊंड सिस्टिम बाबत अनेक अभिनेत्यांनी याआधीही आवाज उठवला होता मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले नाट्यगृह पुढील बाजूने वडापच्या गाड्यांनी तर मागील बाजूने खाऊ गल्लीने वेढले आहे विशेष म्हणजे ह्या नाट्यगृहाच्या एका भागातच नाट्य परिषदेचे कार्यालय आहे आता या नाट्यगृहाबाबत अभिनेते भरत जाधव यांनीच सर्वांसमोर आवाज उठवल्याने रत्नागिरीचे नाट्य क्षेत्राचे नाव खराब झाले आहे.
रत्नागिरीत नाट्यप्रयोगादरम्यानच्या एका अनुभवावरून भरत जाधव चांगलाच नाराज झाला
भरत जाधव हा मनोरंजनसृष्टीतील बहुआयामी अभिनेत्यांपैकी एक आहे. आतापर्यंत विविध नाटक-मालिका-चित्रपटांमध्ये काम करत त्याने प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळवलं आहे. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. भरत जाधव सध्या मराठी रंगभूमीवर कार्यरत आहेत. रत्नागिरीत नाट्यप्रयोगादरम्यान भरत जाधवला एक वाईट अनुभव आला आहे. या अनुभवानंतर त्याने रत्नागिरीत पुन्हा प्रयोग न करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन प्रयोगादरम्यानच त्याने हात जोडत रत्नागिरीत पुन्हा पाय ठेवणार नाही, असे म्हटले आहे. भरत जाधवचा हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काल रात्री रत्नागिरीत भरत जाधवच्या ‘तू तू मी मी’ या नाटकाचा प्रयोग होता. मात्र, नाट्यगृहात AC आणि साउंड सिस्टीम नव्हती. त्यामुळे भरत जाधव नाराज झाला. “AC नसल्याने काय होतं हे आमच्या भूमिकेतून पाहा,” अशी कळकळीची विनंती भरत जाधवांनी प्रेक्षकांना केली. याशिवाय प्रेक्षक एवढे शांत कसे राहू शकतात, रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही, असं भरत जाधव यांनी प्रेक्षकांची हात जोडून माफी मागत जाहीर केलं.
नाट्यगृहाची जबाबदारी रत्नागिरी नगर परिषदेकडे आहे सावरकर नाट्यगृहातील गैरसोयी बाबत सुधारणा करण्याची वेळोवेळी केवळ आश्वासने देण्यात आली प्रत्यक्षात कोणतेही कार्यवाही झालेली नाही