कोंकण

सावंतवाडीतून अर्चना घारे शरद पवार गटाच्या उमेदवार म्हणूनच लढणार – पुंडलिक दळवी

सिंधुदुर्ग – सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाच मिळणार आहे. कामाला लागा असे आशीर्वाद पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्हाला दिले आहेत. त्यामुळे निश्चितच अर्चना घारे-परब निवडणूकीच्या रिंगणात महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून उतरणार अशी माहिती सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी दिली. आज सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

दळवी म्हणाले, आमचा शरद पवार यांच्यावर विश्वास आहे. ते आमच्या पाठीशी आहेत. हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा असून येथून अर्चना घारे-परब या महाविकास आघाडीच्या उमेदवार असणार आहेत. दोन दिवसांत याबाबतचा निर्णय होईल. इतर चर्चाबाबत आज बोलणार नसून योग्यवेळी भुमिका स्पष्ट करू असेही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस, दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!