डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का, ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांचा पक्षाला रामराम

ठाणे – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी ६५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. महाविकास आघाडीची जागा वाटपाची पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेची यादी समोर आली. ठाकरेंच्या यादीतील काही नावांवरुन मविआतील मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केलेली असताना ठाकरेंच्या सेनेचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी वेगळा निर्णय घेतला. सदानंद थरवळ यांनी डोंबिवली विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन नाराजी दर्शवत राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. डोंबिवली विधानसभा मतदारसंघात दीपेश म्हात्रे यांना ठाकरेंच्या शिवसेनेनं पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर केली. या निर्णयावर नाराजी दर्शवत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी राजीनामा दिला.
निष्ठावान, पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या शिवसैनिकांवर वेळोवेळी अन्याय करून, आयात उमेदवारांवर विश्वास दाखवून त्यांना उमेदवाऱ्या देण्यात येत असतील तर निष्ठावान शिवसैनिकांनी करायचे काय, असा प्रश्न उपस्थित करत डोंबिवलीतील ज्ये्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख पद आणि शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा बुधवारी पक्षप्रमुख उध्व ठाकरे यांच्याकडे दिला. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिंद शिवसेनेचे दिपेश म्हात्रेंना आयत्या वेळी पक्षात घेऊन डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने थरळ आणि त्यांचे समर्थक अस्वस्थ होते, दीपेश म्हात्रे यांच्या पक्ष प्रवेश किंवा प्रचार कार्यात ते सहभागी होत नव्हते. त्याचवेळी थरवळ वेगळी भूमिका घेतील अशी राजकीय अटकळ बांधली जात होती.
मागील ४४ वर्ष शिवसेनाप्रमुख, पक्ष्रमुख उध्दव ठाकरे, यांच्याशी एकनिष्ठ राहून पक्ष संघटना वाढीसाठी आपण नेहमीच महत्वाची भूमिका घेतली. या काळात इतर पक्षांकडून विविध प्रकारची प्रलोभने येऊनही आम्ही कधी आमची निष्ठा सोडली नाही. त्या निष्टेची आता कदर होत नसेल आणि सत्ता तेथे उडी घेणान्या दलबदलूंना पायघड्या घालून त्यांच्या विजयासाठी निष्षावान शिवसैनिकांना जुंपण्यात येत असेल तर शिवसेनाप्रमुख, आनंद दिघे यांचा निष्ठावान शिवसैनिक ते कदापी सहन करणार नाही त्यामुळे आपण शिवसेना जिल्हाप्रमुख पद आणि शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत, असे थरवळ यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.