कोंकण

उदय सामंत यांचे मोठे शक्ती प्रदर्शन, आज दाखल केला उमेदवारी अर्ज

रत्नागिरी – विधानसभा मतदार संघातून महायुतीतील घटक पक्ष शिवसेनेचे उमेदवार म्हणून विद्यमान पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्याआधी त्यांनी मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला. रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे हा अर्ज त्यांनी सादर केला.

यावेळी बांधकाम मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे नेते रवींद्र चव्हाण, भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बंटी वणजू आणि माजी नगराध्क्ष सुदेश मयेकर यावेळी उपस्थित होते. या नंतर पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रचाराची जाहीर सभा माळनाका येथील हॉटेल विवेकच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती. या मैदानावर तुडुंब गर्दी जमली होती त्यात महिलांची संख्या मोठी होती दुपारी कडकडीत ऊन असूनही मतदारांनी मोठी हजेरी लावली होती त्यामुळे सामंत यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले.

यावेळी उदय सामंत यांचे बरोबरच मंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित होते या ‘मेळाव्यात महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!