कोंकणमहाराष्ट्रराजकीय

बाळ मानेंच्या वाडीतील युवकांचा शिवसेनेत प्रवेश;उदय सामंत यांना विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार !

बाळ मानेंच्या वाडीतील युवकांचा मोठया प्रमाणावर शिवसेनेते प्रवेश

रत्नागिरी :  रत्नागिरी तालुक्यातील उबाठा गटाचे उमेदवार बाळ माने यांचं होम स्पीच असलेल्या मिन्या गावातील मराठवाडीच्या युवकांनी आज मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उदय सामंत यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार या युवकांनी केला आहे. या प्रसंगी बोलताना अभि सावंत यांनी सांगितले की, शिवसेनेच्या जनसेवेच्या कार्यामुळे आणि मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. यावेळी आमच्या मराठवाडीती सर्व ग्रामस्थ हे उदय सामंत यांच्या पाठी उभं राहून मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार आज करत असल्याचं सांगितलं. मंत्री उदय सामंत यांनी या नव्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. त्यांनी सांगितले की, शिवसेना ही जनतेच्या सेवेची संस्था आहे आणि या नव्या सहकाऱ्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकत आणखी वाढेल. याप्रसंगी अभि सावंत, गोपी सावंत, अमर घाणेकर, वैभव धुळप, पवन मिरकर, सागर कदम, साईराज सावंत, गौरेश पाटील, ओंकार सावंत, चेतन कदम, घाऱ्या मयेकर, अभिषेक सावंत, रुपेश शिवलकर, प्रतीक फटकरे आदित्य सावंत, अमेय सावंत, अभिषेक सावंत यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज स्वीकारत उदय सामंत यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. बाळ माने यांच्या मरावाडीतली युवांनी केलेला शिवसेनेत प्रवेश हा बाळ माने यांना मोठ्या धक्काच मानवा लागेल. या पक्षप्रवेशामुळे रत्नागिरी तालुक्यातील शिवसेनेची ताकत वाढली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!