मुंबईमहाराष्ट्रराष्ट्रीय

न्यूयॉर्क कोर्टाच्या आरोपांनंतर अदानी ग्रुप मोठ्या अडचणीत: शेअर्स कोसळले

मुंबई : न्यूयॉर्क फेडरल कोर्टाने अदानीसह एकूण 7 जणांवर हा आरोप केला आहे. बाजार उघडण्यापूर्वी ही बातमी आली आणि बाजार उघडताच समूहाचे सर्व शेअर कोसळले. बहुतांश शेअर्समध्ये लोअर सर्किटला धडकले आहे. हिडेनबर्ग प्रकरणानंतर अदानी ग्रुप आणि गौतम अदानी पुन्हा एकदा मोठ्या अडचणीत सापडले आहेत. गौतम अदानी यांनी सौरऊर्जा प्रकल्प मिळविण्यासाठी 250 दशलक्ष डॉलर्सची लाच देण्याचे आश्वासन भारतीय अधिकाऱ्यांना दिले होते. अदानी एनर्जी सोल्युशनचे शेअर्स 20 टक्क्यांच्या लोअर सर्किटवर आले आहेत. याशिवाय अदानी एंटरप्रायझेसमध्ये 10 टक्के, अदानी ग्रीन एनर्जीमध्ये 20 टक्के, अदानी पोर्ट्समध्ये 10 टक्के, अदानी पॉवरमध्ये 13 टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये 15 टक्के, अंबुजा सिमेंट्समध्ये 10 टक्के लोअर सर्किट दिसत आहे.

गौतम अदानी यांच्यावर 250 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 2100 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. ही रक्कम अमेरिकी आणि परदेशी गुंतवणुकदारांकडून उभारण्यात येणार होती. या संपूर्ण प्रकरणात गौतम अदानीशिवाय सागर अदानी, विनीत जैन यांच्यासह 7 जणांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. या बातमीमुळे आधीच दबावाखाली असलेल्या बाजारातील सेंटिमेंट आणखी कमकुवत झाले आहेत. निफ्टी 230 पेक्षा जास्त अंकांनी घसरला आहे आणि 23300 च्या खाली घसरला आहे. अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयाने सांगितले की, 2020 ते 2024 दरम्यान, एका भारतीय अक्षय ऊर्जा कंपनीने सौर ऊर्जा पुरवठ्याचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना लाच देण्याचा मार्ग स्वीकारला असल्याचा आरोप करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!