महाराष्ट्रमुंबई

कर्जमाफी करुन राज्याला विशेष पॅकेज द्या – किसान सभेची मागणी

मुंबई : राज्यात सातत्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना दिसत आहे, नापिकी, कर्जबाजारीपणा, दुष्काळ अशा विविध कारणांनी शेतकरी आपलं आयुष्य संपवत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या 60 दिवसाच्या काळात विदर्भातील तब्बल 167 शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. महाराष्ट्रात उर्वरित ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे वक्तव्य किसान सभेचे नेते डॉ. अजित यांनी केलं आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं ही बाब लक्षात घेत महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज देत शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी पावलं टाकावीत अशी मागणी किसान सभेनं केली आहे. शेतीमालाचे भाव सातत्याने पाडण्याचे धोरण, वाढता उत्पादन खर्च व नैसर्गिक आपत्तीत होणारे शेतकऱ्यांचे नुकसान या प्रमुख कारणांमुळे शेतकऱ्यांच्या या आत्महत्या वाढत असल्याचे अजित नवले म्हणाले.

राज्यात विविध कारणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, हवामानातील बदल, शेत मालाला भाव नसणे इत्यादी अनेक कारणास्तव मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त भागाकडे शासनाने विशेष लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. तसेच आत्महत्यांसाठी कारणीभूत ठरणाऱ्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे. या आत्महत्या रोखण्यासंदर्भात शासनाने कोणती उपाययोजना करावी तसेच केंद्र सरकारने शेतकरी आत्महत्येची बाब लक्षात घेत महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे अशी मागणी अजित नवले यांनी केली आहे. सरकारनं शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी पावलं टाकावीत. शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करुन शेतीमालाला रास्त दर देत, नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांना दिलासा देणारी धोरण घ्यावीत. महाराष्ट्रात वाढत असलेल्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर वरील प्रमुख बाबींचा समावेश असणारे दिलासा पॅकेज शेतकऱ्यांना द्यावे, अशी मागणी किसान सभेच्या वतीने करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!