मुंबईमहाराष्ट्रविदर्भ

मुलांनाही फी सवलत देण्याचा विचार होईल – मंत्री चंद्रकांतदादा पाटील

नागपूर : राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करून कालांतराने मुलींप्रमाणेच मुलांनाही व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी फीमध्ये सवलत देण्याचा विचार केला जाईल, असे उद्गार विद्यमान मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले. फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना अद्यापी खाते वाटप झालेले नाही. पाटील हे मागील सरकारमध्ये उच्च व तंत्रशिक्षण खाते सांभाळत होते.

मुंबईहून नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या पत्रकारांच्या सुयोग निवासस्थानी पाटील पत्रकारांशी संवाद साधत होते. ते म्हणाले की राज्यात 14 लाख विद्यार्थिनी आहेत त्या पैकी दोन लाख मुली व्यावसायीक ( मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट आदि) अभ्यासक्रमांत शिक्षण घेतात. त्यांना राज्य सरकार संपूर्ण फी देते. विना अनुदानित वैद्यकीय अभ्यासक्रमाची वार्षीक फी दहा लाखांपर्यंत असू शकते. अनेक अत्याधुनिक व्यावसायीक अभ्यासक्रमांच्याही फी मोठ्या रकमेच्या असतात, असेही दादाांनी स्पष्ट केले. महाविद्यालये जो अभ्यासक्रमावर करत असतात, त्या प्रमाणात त्यांना राज्य शासनाकडून फीची प्रतीपूर्ती केली जाते.

सध्या हा खर्च नऊशे कोटी रुपये केला जातो. त्यात जर मुलांच्या फीचाही समावेश केला तर राज्याच्या तिजोरीवर 1400 कोटींचा बोजा पडेल. त्याचा विचार कालांतराने होऊ शकेल. सध्या राज्यातली विद्यार्थ्यांची एकूण संख्या पन्नास लाख व्हावी या दृष्टीने सरकारचे नियोजन आहे.

मुलींसाठी दहा दहा लाखांची फी सवलत मात्र मुलांसाठी तसे काही नाही, हा उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांवर अन्याय नाही का, या प्रश्नावर बोलताना पाटील म्हणाले की फी अधिक असते तेंव्हा पालकांचा कल मुलीपेक्षा मुलाला शिकवण्याकडे असू शकतो. त्यासाठी मुलींना फी सवलत देणे हे योग्य ठरते.

विद्यार्थिनींना फीमद्ये सवलत देण्याचा उद्देषच त्यांची उच्च व्यावसायीक शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या वाढावी असा आहे त्याचा फायदा होतो आहे. सध्याची 14 लाखांची विद्यार्थिनींची संख्या वीस लाखापर्यंत वाढायला हवी. व्यावसायीक अभ्यासक्रमांची फी सवलतीची योजना ही आधी 648 अभ्यासक्रमांसाठी लागू होती. त्यात मागच्या वर्षात भर घातली गेली असून आता ही संख्या 842 अभ्यासक्रम इतकी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!