नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम- पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी,दि.७:नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत राज ठाकरेंनी केलेल्या पत्रव्यवहाराबाबत मी काहीही बोलणार नाही,
राज ठाकरे एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांना त्यांची भूमिका मांडायचा लोकशाहीने अधिकार दिलेला आहे.मात्र शिवसेना नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग चे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे केले.
मागिल सरकारच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख ऊद्धव ठाकरे यांनी देखील नाणार बाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यावेळी तिथल्या ग्रामस्थांचा रिफायनरी प्रकल्पाला तिव्र विरोध केला होता. आणि मागिल सरकारने हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानी त्यांची भूमिका मांडलेली आहे. मध्यंतरी रिफायनरी समर्थकांनी देखील माझी भेट घेतली. त्यांना आपण सांगितले की तेथिल जागेचा उपयोग स्थानिक लोकांना रोजगार निर्मितीसाठी झाला पाहिजे. त्याचाच एक भाग म्हणून देशातील एक मोठे इनोव्हेशन पार्क कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत आहे. रायगड जिल्ह्यात केमिकल झोन असल्यामूळे तिथे केमिकल इन्डस्ट्री येईल. रत्नागिरी जिल्ह्यात उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत काही प्रकल्प राबविले जातील. सिंधूदुर्ग जिल्ह्यात पर्यटनावर आधारित प्रकल्प येतील. या माध्यमातून कोकणातील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होतील. हा ऊद्देश आहे. मात्र नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना आपल्या भूमिकेवर कायम आहे असे सांमत यांनी सांगितले