महाराष्ट्रमुंबई

सरपंच हत्याकांड प्रकरणी ग्रामपंचायत बंद यशस्वी

मुंबई / रमेश औताडे 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाल्यामुळे दोषीवर कडक कारवाई करावी व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी संरक्षण कायदा करावा या मागणीसाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने गुरुवारी एक दिवस राज्यभरातील ग्रामपंचायत बंद करण्याचे आंदोलन केले.

राज्यातील अनेक जिल्ह्यांतील बहूतांश सर्व ग्रामपंचायतीने बंद पाळून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे . राज्यातील सुमारे १५ हजार ग्रामपंचायतीमध्ये स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहून ग्रामपंचायत काम बंद आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायती बंद राहिल्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे निर्माण झालेला असंतोष ग्रामीण महाराष्ट्रात दिसून आला. तसेच सरपंच व त्यांचे सहकारी कर्मचारी हेही त्यांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायद्यासाठी आक्रमक झाल्याचे चित्र राज्यभर दिसून आले.

सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सुचने नुसार राज्यातील सर्वच विभागात प्रत्येक जिल्ह्यात ग्रामपंचायतीने उत्स्फूर्तपणे बंद पळून त्याला चांगला प्रतिसाद दिला. राज्यातील सरपंच उपसरपंच कर्मचारी काही गावातील गावगुंडा पासून भयभीत झालेले आहेत समाजसेवा करताना अनेक जण यांच्या दबावाखाली काम करत आहेत तेलंगणा व राजस्थान मधील न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे सरपंचाच्या फिर्यादी नुसार शासकीय कामातील अडथळ्याचा गुन्हा गाव गुंडावर दाखल करावा अशी मागणी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!