महाराष्ट्रमनोरंजनमुंबई

‘मी भारतात नाही…’ – समय रैनाने पोलिसांसमोर हजर न होण्याचे दिले कारण!

मुंबई: ‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादातील समय रैनाला महाराष्ट्र सायबर विभागाने 17-18 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. मात्र सध्या समय रैना हा भारतात नसल्यानं त्याला ते शक्य नसल्यानं त्यानं 17 मार्चपर्यंतचा वेळ मागितला आहे. पण सायबर सायबर विभाग मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसून येत आहे.
‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये पालकांबद्दल केलेल्या अश्लील वक्तव्यामुळे रणवीर आणि समय रैना वादात सापडला आहे. त्यांच्याविरोधत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच दोघांना आणि शोच्या इतर सदस्यांनाही पोलीस चौकशीसाठी एक एक करून बोलवलं जात आहे.

समयने महाराष्ट्र सायबर विभागाला मागितला काहीसा वेळ

हा वाद चिघळल्यानंतर समयने त्याच्या चॅनेलवरून शोचे सर्व व्हिडिओ काढून टाकले आहेत. समय रैनाला समन्स बजावण्यात आले त्यानुसार त्याला 17 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी महाराष्ट्र सायबर विभागासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मात्र त्यासाठी त्याने काहीसा वेळ मागितला आहे.

17 मार्चपर्यंतचा वेळ मागितला

समय रैनाने महाराष्ट्र सायबर विभागाकडे 17 मार्चपर्यंतचा वेळ मागितला आहे. याचं कारण म्हणजे समय सध्या भारतात नसून तो अमेरिकेत आहे. त्याने पोलिसांना सांगितले आहे की, तो सध्या भारतात नसून अमेरिकेत आहे. त्याचे अमेरिकेत शो आहेत आणि त्यासाठी तो तिथे गेला आहे. त्याने शोची माहिती सायबर विभागालाही दिली आहे. त्यामुळे त्याने 17 मार्चपर्यंतचा वेळ मागितला आहे.

समय भारतात नसून समय अमेरिकेत आहे

समय रैनाने शेअर केलेल्या वेळापत्रकानुसार, त्याचे 16 फेब्रुवारी आणि 20 फेब्रुवारी रोजी अमेरिकेतही शो आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्र सायबर विभागाने त्याला 17-18 फेब्रुवारी रोजी मुंबईत येण्यास सांगितले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला सांगितले की तो 17-18 नंतर 20 फेब्रुवारी रोजी अमेरिकेत जाऊन त्याचा शो करू शकतो. मात्र या प्रकरणात आणखी काय अपडेट्स येणार हे पाहणे महत्त्वाचं आहे.

आसाम पोलिसही कारवाई करण्याच्या मार्गावर

गुवाहाटीमध्येही समय रैनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आसाम पोलिसही कारवाई करण्याच्या मार्गावर आहेत. समय रैनाचे घर पुण्यातील बालेवाडी येथे आहे. अशा परिस्थितीत, आसाम पोलीस पुण्यातील त्याच्या घरी जाण्याची शक्यता आहे. त्याच्या घरी नोटीस लावण्यात येऊन त्याला चार दिवसांत हजर राहण्यास सांगितलं जाईल असंही म्हटलं जात आहे.

पुढील कारवाई काय केली जाईल?

रणवीर अलाहाबादियाने शोमध्ये पालकांबद्दल केलेल्या एक टिप्पणीमुळे हा वाद वाढला आहे. त्यानंतर लोकांनी त्याला, या शोला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं. वाद वाढल्यानंतर त्याने माफीही मागितली. तसेच शओचे सर्व व्हिडिओ यूट्यूबवरून काढून टाकले मात्र तरीही हे प्रकरण शांत होताना दिसत नाहीये. आता या प्रकरणात पुढील कारवाई काय केली जाईल हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!