महाराष्ट्रकोंकण

जनतेच्या सहमतीशिवाय रिफायनरी नाही – भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांची भूमिका

दापोली : रिफायनरी आपल्या भागात आणायची की नाही हा सर्वस्वी येथील जनतेचा निर्णय आहे. त्यामुळे येथील जनतेने आता आपल्याला रिफायनरी हवी आहे की नाही हे ठरवावे. स्थानिक जनतेला हवी असेल तरच रिफायनरी होईल, अशी माहिती भाजपचे राज्य प्रवक्ते अवधूत वाघ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी येथील जनता आंब्याच्या व नारळांच्या झाडांमध्ये समाधानी असेल तर ते काही चुकीचे नाही. मात्र येथील जनतेने आता आपल्याला रिफायनरी हवी आहे की नाही ते एकदा ठरवावे, असे स्पष्ट केले.

अर्थसंकल्पाबाबत बोलताना ते म्हणाले, शेतकरी, गरीब, महिला आणि युवा हे विकसित भारताचे चार प्रमुख स्तंभ असून या चारही गटांच्या सशक्तीकरणासाठी अर्थसंकल्पाने महत्वाची पावले उचलली आहेत. सामाजिक क्षेत्र, लहान मुले व युवा शिक्षण, पोषण तसेच आरोग्यापासून स्टार्टअप व गुतवणुकीपर्यंत प्रत्येक क्षेत्राला गती देणाऱ्या तरतूदी करण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!