काजू उत्पादनाला फटका! सिंधुदुर्ग जिल्ह्यात 50 टक्क्यांवर घट

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी आंबा फळपीक काहीसे जोमात असतानाच काजू पिकाने मात्र शेतकऱ्यांना अडचणीत आणलेले दिसत आहे. अनेक ठिकाणी सातत्याच्या धुक्यामुळे काजू मोहर जळून नष्ट झाला तर उर्वरित काजू पिकात मोहर दिसत असला तरी अपेक्षित फळधारणा झालेली दिसत नाही. त्यामुळे यावर्षी कलमी काजू उत्पादनात बरीच घट होण्याची शक्यता असून, काजू उत्पादक शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. काजू बीचा भाव यावर्षी सुरुवातीलाच काही ठिकाणी किलोप्रमाणे 170 ते 180 रुपये असून, त्यात स्थिरता आहे.
काजू बीच्या दरात हंगामाच्या सुरुवातीला चांगला भाव मिळत आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी काजू बीला 170 ते 180 रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. राजापूर तालुक्यात काजू बीला 160 रुपये प्रतिकिलो दर मिळतो. यावर्षी काजू बी दरात तेजी असली तरी काजू बी च्या उत्पादनात यावर्षी मंदी असल्याचे चित्र दिसत आहे.