महाराष्ट्रकोंकण

राजापूर प्रकरण: दोन्ही समाजांच्या प्रतिनिधींशी चर्चा, आ. किरण सामंत यांचे शांततेचे आवाहन!

राजापूर : राजापूर शहरासह राजापूर तालुक्याचे आराध्य देवत असलेल्या श्री देव धूतपापेश्वर व नवलादेवी देवतांच्या होळ्या बुधवारी रात्री राजापूर शहरातून वाजत-गाजत धोपेश्वर मुक्कामी नेण्यात आल्या. मात्र शहरातील जवाहर चौक येथे होळी नाचवताना ही होळी जामा मशिदीच्या गेटपर्यंत घुसविण्याचा प्रयन्न काहीनी केल्याने काहीकाळ सामान्य तणाव निर्माण झाला होता. पोलीस यंत्रणांनी स्थितीवर नियंत्रण मिळविल्यानंतर वातावरण सौम्य झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार किरण सामंत यांनी दोन्ही समाजातील प्रतिनिधींची बैठक घेत शांतता व सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे. मात्र या घटनेमुळे शहरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या पाश्र्वभूमीवर आमदार किरण सामंत यांनी गुरुवारी तातडीने राजापुरात येत प्रशासनाशी चर्चा केली. त्यानंतर दोन्ही समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेत राजापुरातील सलोखा कायम राखण्यासाठी सर्वांनी शांतता राखाण्याचे आवाहन केले. त्याला नागरिकांनीही प्रतिसाद दिला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राजापुरातील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. एका स्ट्रायकिंग कोर्ससह एक आरपीसी प्लाटून्, एक एसआरपी प्लाटून्, दोन पोलीस निरीक्षक, आठ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ४५ पोलीस हवालदार, बारा होमगार्डस अशी कुमक सध्या राजापुरात तैनात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!