महाराष्ट्रकोंकण

संकल्पना मांडणारे आणि ती पूर्तते पर्यंत नेणारे – पालकमंत्री उदय सामंत!

रत्नागिरी : थिबा राजवाडा येथील 3D लेझर शो चे आज उद्‌घाटन होत आहे. त्यासाठी राजवाड्याच्या दर्शनी बाह्यभागाचे काम अत्यंत उत्तमरित्या केले गेले. त्यातून राजवाडा मूळ स्वरूपात दिसू लागला. हे restoration चे काम उत्तम सुरू आहे. शिवाय राजवाडा दर्शनी भाग लेझर शो साठी आवश्यक असलेल्या बैठक व्यवस्थेला अनुकूल केला गेलाय. त्याला जोडून उत्तम लॅण्डस्केप तयार झालंय. दर्शनी भागात झालेल्या प्रेक्षागृहाचा आर्ट सर्कल संगीत महोत्सवासाठी सुद्धा उत्तम उपयोग झाला. लेझर शो होणार तर संगीत महोत्सवाचे काय होणार अशी शंका एकदा मनात येऊन गेली होतीच. त्यासाठी पालकमंत्री श्री. उदय सामंत साहेबांना भेटल्यावर एका क्षणात त्यांनी उद्घाटन कार्यक्रम पुढे नेला आणि सांगितलं की संगीत महोत्सव नेहमीप्रमाणे करून घ्या. आणि तो दरवर्षी होईल ह्याबद्दल खात्री बाळगा. तुम्ही खूप वर्ष हे काम करत आहात. ते तसंच चालू राहू दे. मी सगळी मदत करणार. ‘एकीकडे महोत्सव सुरू राहण्याचा आनंद आहेच. पण त्याहीपेक्षा जास्त आनंद आहे की अत्यंत आधुनिक पद्धतीचा 3D लेझर शो सुरू होतोय. अत्याधुनिक तंत्रज्ञान रत्नागिरीत आलं आहे आणि त्याद्वारे रत्नागिरीच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे.

115 वर्ष जुनी इमारत पुन्हा त्याच स्वरूपात बघायला मिळणं हा माझ्यासारख्या स्थापत्य अभियंत्यासाठी जास्त आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. हे सर्व काम पूर्णत्वास नेणाऱ्या सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, तसेच सर्व आर्किटेक्ट, तांत्रिक सल्लागार व सर्व कंत्राटदार ह्यांचे अभिनंदन. ह्या सगळ्या संकल्पनेची मांडणी करणारे आणि त्याच्या पूर्ततेसाठी झटणारे पालकमंत्री श्री. उदय सामंत साहेब ह्यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपक्रमाचे स्वप्न बघणे आणि ते सत्यात उतरवणे हे सोपं काम नाही. त्यामुळे असं भव्य स्वप्न बघून ते सत्यात उतरवल्याबद्दल उदद्यजींचे अभिनंदन. आधी तारांगण आणि आता लेझर शो! रत्नागिरीच्या पर्यटन क्षेत्रात बदल करण्याची क्षमता असलेले दोन उपक्रम. आणि हो त्याच बरोबरीने तितक्याच उत्तमरित्या तयार झालेली शिवसृष्टी सुद्धा रत्नागिरीच्या सौंदर्यात भर घालणार आहे. सर्व रत्नागिरीकर मंडळीनी ह्या सर्व उपक्रमाचा आनंद घ्यावा आणि आपल्या नातेवाईक, मित्रमंडळींना पण त्यासाठी आमंत्रित करावे. इथला पायरव जितका वाढेल तितकी ह्या उपक्रमांची यशस्वीता वाढेल आणि हे असे उपक्रम maintain ठेवणं सहज राहील. पुन्हा एकदा उदयजींचे मनापासून आभार!

नितीन कानविंदे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!