महाराष्ट्रमनोरंजनमुंबईसाहित्यिक

रवींद्र नाट्य मंदिरात रंगणार सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन! अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार

मुंबई : मुंबईतील स्वामीराज प्रकाशन आणि कणकवलीतील प्रभा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ” सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून संमेलनाध्यक्षपदी कवी नारायण सुर्वे यांच्या कवितांचे अभ्यासक, ज्येष्ठ अभिनेता प्रमोद पवार यांची निवड करण्यात आल्याची घोषणा आयोजकांनी केली आहे.

दिवंगत कवी नारायण सुर्वे यांचा स्मृती जागर करणारे हे एकदिवसीय साहित्य संमेलन गुरुवार, २७ मार्च २०२५ रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर मध्ये संपन्न होणार आहे. सकाळी १० ते रात्री १० पर्यंत या संमेलनात नारायण सुर्वे यांच्या गीतांचे शाहिरी गायन, काव्य अभिवाचन, परिसंवाद, मुलाखत, निमंत्रितांचे कवी संमेलन, एकांकिका आणि ” आणखी एक मोहन्जोदारो” या बहुचर्चित लघुपटाचे प्रदर्शन असा भरगच्च कार्यक्रम आखण्यात आला आहे. या संमेलनास सर्व साहित्य रसिकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन स्वामीराज प्रकाशनचे रजनीश राणे आणि प्रभा प्रकाशनचे अजय कांडर यांनी केले आहे.

मास्तरांची सावली पुरस्कार या संमेलनात प्रदीप आवटे, योगिता राजकर, सुनील उबाळे, सफर अली इसफ, मधुकर मातोंडकर आणि सुजाता राऊत या साहित्यव्रतींचा ” मास्तरांची सावली ” पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि ग्रंथ भेट असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!