महाराष्ट्रमुंबई
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर विश्वासदर्शक प्रस्ताव मंजूर

मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर संपूर्ण विधान परिषद विश्वास व्यक्त करीत असल्याचा विश्वासदर्शक प्रस्ताव आज सभागृहात मंजूर करण्यात आला. भाजप गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी हा प्रस्ताव विधान परिषदेत मांडला होता.
“महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर ही विधान परिषद पूर्ण विश्वास व्यक्त करत आहे”, असा एक ओळीचा प्रस्ताव आ. दरेकर यांनी सभागृहात मांडला. यानंतर विधान परिषदेचे सभापती यांनी हा प्रस्ताव मतासाठी ठेवला. आवाजी मतदानाने सभागृहाने हा प्रस्ताव मंजूर केला.
यानंतर सभापतींनी “प्रस्ताव मंजूर झालेला आहे” अशी अधिकृत घोषणा केली. यासोबतच उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर विधान परिषदेचा पूर्ण विश्वास असल्याची अधिकृत नोंद झाली.