महाराष्ट्रकोंकणमुंबईशैक्षणिक
बोगस पदवी घोटाळा! परप्रांतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढली, भास्कर जाधवांचा गंभीर आरोप
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील खरे ढेरे भोसले महाविद्यालयात परप्रांतीय विद्यार्थ्यांचा प्रथम वर्ष प्रवेश, हजेरी, परीक्षा असे सारे काही बोगस दाखवून त्यांना मुंबई विद्यापीठातून थेट पदवी प्रमाणपत्र दिले जात असून यातून मोठा आर्थिक गैरव्यवहार देखील करण्यात येत असून शिक्षण क्षेत्रातल्या या गैरव्यवहार प्रकरणात हुकमाचे ताबेदार होण्यास नकार दिल्याचे तीन प्राध्यापकांना मारहाण देखील करण्यात आल्याचे व या प्रकरणी शेकडो प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते, गुहागरचे आमदार भास्करराव जाधव यांनी विधानसभेत केला. त्यावर राज्याचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कारवाईचे आदेश पारित केले आहेत.