महाराष्ट्रमुंबईशैक्षणिक
शालेय पोषण आहारात बदल! तेलाचा वापर १० टक्के कमी करण्याचा शिक्षण खात्याचा निर्णय
मुंबई : पाच वर्षापासून ९ वर्षे वयापर्यंतच्या मुलांमध्ये स्थुलपणा दिसून येत आहे. त्यामुळे पीएम पोषण अभियानांतर्गत सरकारी व अनुदानित शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या माध्यान्य आहारामध्ये तेलाचा वापर १० टक्के कमी करण्याचा आदेश शिक्षण खात्याने बजावला आहे. लहान मुलांमध्ये स्थुलपणा वाढत आहे. यामागे विविध कारणे आहेत. त्यांची जीवनशैली हे त्यापैकी एक मुख्य कारण आहे. आजकाल मुले हातात मोबाईल असल्याशिवाय जेवत नाहीत, नाश्ता करीत नाहीत की, इतर कामे करीत नाहीत. तासनता मोबाईलवर घालत असल्याने शरीराची हालचाल होत नाही. खेळांकडे दुर्लक्ष होत आहे. शिवाय बुद्धीला चालना देणाऱ्या घरामध्ये खेळता येणाऱ्या खेळांकडेही दुर्लक्ष होत आहे.