महाराष्ट्रमुंबईशैक्षणिक

गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक भीमजयंती- विधानपरिषद उपसभापती  नीलम गो-हे यांच्या कडून एक वही एक पेन अभियानचे कौतुक

मुंबई : समाजातील आर्थिक दुर्बल व आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करणा-या महामानव प्रतिष्ठान व एक वही एक पेन अभियानने यंदाची भीमजयंती शैक्षणिक भीम जयंती साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

या अभियानांतर्गत विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांच्या विधानभवन कक्षात आज भेट घेण्यात आली.समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी मागील १० वर्षांपासून सुरू असलेल्या एक वही एक पेन अभियानाचे यावेळी गो-हे यांनी कौतुक केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणाप्रती असलेली भूमिका लक्षात घेता चळवळीत काम करणा-या समाजसेवकांनी राज्यात ठिकठिकाणी हे अभियान राबवावेअसे आवाहन देखील त्यांनी केले .

यावेळी शिवसेना उपनेत्या कला शिंदे ,उपनेते राहुल लोंढे, अभियानचे प्रमुख ज्येष्ठ पत्रकार, समाजभूषण राजू झनके, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड,जेष्ठ पत्रकार समाजभूषण नासिकेत पानसरे, जेष्ठ पत्रकार जासंग बोपेगावकर,  मिरर महाराष्ट्र चे संपादक महेश पावसकर व पत्रकार प्रफुल चव्हाण हे उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!