महाराष्ट्रकोंकण

शिवराजेश्वर मंदिराच्या देखभालीसाठी शासनाने ५० हजार मासिक निधी द्यावा

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराजेश्वर मंदिरासाठी दरमहा केवळ 250 रु. अर्थसहाय्य देण्यात येते हा अन्याय आहे, अशी भूमिका हिंदू जनजागृती समिती शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली. या मागणीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवराजेश्वर मंदिरासाठी दरमहा 50 हजार रु. निधी वाढवून देण्यासाठी तत्काळ प्रस्ताव सादर करा, असे लिखित आदेश महसूल सचिवांना दिल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी दिली.
दरम्यान शासनाची मदत मिळण्याआधी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने वैयक्तिकरित्या महाराजांच्या या मंदिरासाठी 50 हजार रुपयांची मदत दिली. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. समितीच्या वतीने सतीश सोनार, रवी नलावडे आणि नांदेड येथील शिवसेनेचे आ.आनंद बोंडारकर उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!