राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाचे अर्बन सेलचे अध्यक्ष हर्षद स्वार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठकीचे आयोजन

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांचं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष केंद्रित राहणार आहे. मुंबई सह राज्यातील अनेक नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. सध्या याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने मुंबई आणि महानगर क्षेत्रात अर्बन सेल तयार केलाय. मुंबई तील राष्ट्रवादी भवन येथे मुंबई आणि नवी मुंबईतील अर्बन सेलची बैठक घेण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट पक्षाचे अर्बन सेलचे अध्यक्ष हर्षद स्वार यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई उपाध्यक्ष उत्तमराव माने, अर्बन सेल कोर कमिटी सदस्य शरद शृंगारे उपस्थित होते. शहरातील नागरी समस्या कडे लक्ष घालून प्रशासनाच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा उद्दिष्ट अर्बन सेलचे राहणार असून शहरातील वाढतं प्रदूषण आणि अतिक्रमण रोखण्यावर जास्त भर असेल असं अर्बन सेलचे अध्यक्ष हर्षद स्वार यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट या पक्षाचे पक्षाने आगामी निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केल्याचे चित्र सध्या दिसतंय .




