महाराष्ट्रमनोरंजनमुंबई
बॉलीवूडचे ज्येष्ठ निर्माते सलीम अख्तर यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ चित्रपट निर्माते सलीम अख्तर यांचे निधन झाले आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. सलीम अख्तर हे ८० आणि ९० च्या दशकातील लोकप्रिय निर्मात्यांपैकी एक होते.त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सलीम अख्तर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरु होते. ते अनेक दिवसांपासून व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देत होते. अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. मंगळवारी ८ एप्रिल रोजी त्यांनी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.