महाराष्ट्रकोंकण

रत्नागिरी पोलिसांनी समुद्रात बुडणाऱ्या १६ तरुणांचे प्राण वाचवले

रत्नागिरी : दि. 29 रोजी पूर्णगड पोलीस ठाणे हद्दीमधील पावस रनपार गावातील ऐकून 16 तरुण हे मौजमजा करण्यासाठी फिनोलेक्स केमिकल जेटी जवळ “सरस्वती” नामक एका बोटीने समुद्रात फिरण्यासाठी गेले होते.

परंतु समुद्र खवळलेला असल्याने 16 तरुणांना घेवुन जाणाऱ्या सरस्वती बोटी मध्ये बिघाड झाल्याने बोट पलटी झाली व सर्व तरुण पाण्यात ओढले गेल्याची दुर्घटना घडली. जवळच असणान्या दुसऱ्या एका अल fardin बोटीवरील तांडेल  फरीद ताजुद्दिन तांडेल तसेच रत्नागिरी पोलीसदलाचे सूरू असलेले सागरकवच’ अभियान दरम्यान बंदोबस्त कामी सिल्वर सन या पायलट बोटीवर तैनात अमलदार He मुजावर MSF चे जवान विजय वाघाने व अपूर्व जाधव यांच्याद्वारे या सर्वांना तात्काळ मदत देण्यात आली व बुडत असलेल्या 16 तरुणांना मदत करण्यात आलेली आहे.

या सर्व 16 तरुणांना समुद्राच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढून पोलीस स्थानकात आणण्यात आले व त्यानंतर सर्व 16 जणांवर प्रथमोपचार करून त्यांच्या पालकांच्या व नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. तसेच सरस्वती बोट ही पाण्यात बुडलेली आहे. या घटनेचा अधिक तपास पूर्णगड पोलीस ठाणे करीत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!