महाराष्ट्रक्रीडामुंबई
आयपीएल 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित, BCCI ने केलं जाहीर

मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे उर्वरित आयपीएलचे सामने स्थगित करणार असल्याचं जाहीर केलं आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या कारणस्तव हा निर्णय घेत असल्याचं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे. या निर्णयानंतर आता विदेशी खेळाडूंना परत पाठवलं जाणार असल्याचीही माहिती आहे. भारत-पाकिस्तान संभाव्या युद्धाच्या फटका आता आयपीएलला बसला आहे. ही संपूर्ण स्पर्धाच आता अनिश्चित काळातसाठी स्थगित करण्यात आली आहे. यापूर्वी युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपीएलचे उर्वरित सामने दक्षिण आफ्रिकेत खेळवल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, बीसीसीआयने स्पर्धाच स्थगित करणार असल्याचं म्हटलं आहे.