महाराष्ट्रकोंकण

रत्नागिरी: खेडशीतील लॉजवर पोलिसांची कारवाई,हॉटेल गौरव लॉज येथे वेश्याव्यवसाय सुरू, चार महिला आणि एक आरोपी ताब्यात

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात अमली पदार्थांवर पोलिसांकडून कारवाई करीत असतानाच आता रत्नागिरी शहराजवळील खेडशी येथे एका लॉजवर चालू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला
रत्नागिरी खेडशी आकाशवाणी केंद्र समोर हॉटेल गोरव लॉज येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसाय ठिकाणावर पोलिसांनी धाड घातली मंगळवारी रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे यांची अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, 1956 कायद्या अंतर्गत संयुक्त कारवाई केली. यावेळी कोकण नगर येथील एकाला अटक करण्यात आली आहे.

दिनांक 13 मे 2025 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे हद्दीत अनैतिक व्यापार” चालू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्वरित कारवाई करण्या करता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तसेच रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे एक पथक तयार करण्यात आले. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार या पथकामार्फत लागलीच एक डमी व्यक्ती पाठवून खेडशी आकाशवाणी केंद्राचे समोर हॉटेल गोरव लॉज येथे छापा टाकण्यात आला.

यावेळी लॉजवर देह विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी 4 महिला आणलेल्या असल्याचे निष्पन्न झाले. या ठिकाणी अरमान करीम खान (रा. कोकणनगर रत्नागिरी) हा चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी आरोपी अरमान करीम खान (रा. कोकणनगर रत्नागिरी) यास दोन पंचांसमक्ष अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, 1956 कायद्या अंतर्गत ताब्यात घेऊन घटनास्थळा वरून तसेच आरोपीच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल तसेच ताब्यात घेण्यात आलेला आरोपी हे पुढील कारवाई करिता रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलेले आहेत. तसेच या गुन्ह्याचा अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत.

ही कामगिरी  पोलीस अधीक्षक, रत्नागिरी व अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक  नितीन ढेरे, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी  राजेंद्र यादव व खालील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
1) स.पो.फो.  सुभाष भागणे, स्था.गु.अ.शा. रत्नागिरी,
2) पो.हवा/477  नितीन डोमणे, स्था.गु.अ.शा. रत्नागिरी,
3) पो.हवा/२५१  शांताराम झोरे, स्था.गु.अ.शा. रत्नागिरी,
4) पो.हवा / 301 बाळू पालकर, स्था. गु. अ.शा. रत्नागिरी.
5) पो.हवा/1238  प्रवीण खांब, स्था.गु.अ.शा. रत्नागिरी,
6) पो.हवा/306 गणेश सावंत, स्था.गु.अ.शा. रत्नागिरी,
7) पो.हवा / 1410 सत्यजित दरेकर, स्था. गु.अ.शा. रत्नागिरी व B) म.पो.हवा/ वेष्णवी यादव, स्था.गु.अ.शा. रत्नागिरी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!