रत्नागिरीत उभारला ब्रॉड पीक एनिमेशन स्टुडिओ – ग्रामीण विद्यार्थ्यांना एनिमेशन शिक्षणाची सुवर्णसंधी

रत्नागिरी : आज ब्रॉड पीक एनिमेशन स्टुडिओला दिलेली भेट ही एक अद्वितीय अनुभव होता. रत्नागिरीसारख्या जिल्ह्यात अशा प्रगत स्टुडिओची उभारणी ही एक मोठी प्रेरणा आहे. क्रिएटिव्ह कल्पनांचा, मेहनतीचा आणि तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट संगम येथे पाहायला मिळाला. स्टुडिओतील कलाकार आणि तज्ज्ञ टीम ज्या प्रकारे आपल्या कल्पनांना सजीव रूप देतात, ते खरच प्रेरणादायी आहे. ऍनिमेशन, ग्राफिक्स, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि स्टोरीटेलिंग या सगळ्याच क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. या आधुनिक स्टुडिओमध्ये केवळ ऍनिमेशन आणि व्हिज्युअल कंटेट निर्मितीच होत नाही, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीही ही एक सशक्त दिशा ठरते आहे.


या स्टुडिओच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना मार्गदर्शन, प्रशिक्षण व करिअरच्या नव्या वाटा खुल्या होत आहेत. ग्रामीण भागात राहूनही जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आत्मसात करता येते, हे ब्रॉड पीकच्या कार्यातून सिद्ध होत आहे. निसर्गरम्य कोकणात. खासकरून रत्नागिरीसारख्या जिल्ह्यात असा अत्याधुनिक आणि सृजनशील ऍनिमेशन स्टुडिओ उभा राहत आहे. हे एक अभिमानास्पद बाब आहे. या स्टुडिओच्या माध्यमातून रत्नागिरी आणि परिसरातील प्रतिभावान पण संधीपासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने नव्या उंचीवर नेण्याचे काम सुरू आहे.

या स्टुडिओमध्ये केवळ व्यावसायिक प्रकल्पांवर काम होत नाही, तर येथील प्रमुख उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून शिकण्याची घडण्याची आणि आत्मनिर्भर होण्याची संधी उपलब्ध करून देणे, स्थानिक तरुणांना Animation, VFX, 3D Designing Storyboarding अशा आधुनिक कौशल्यामध्ये प्रशिक्षण, उद्योगाशी संलग्न प्रकल्पामध्ये सहभागी होण्याची संधी. कोकणातील विद्यार्थ्यांनाही मुंबई, पुणे किंवा इतर महानगरामध्ये न जाता जागतिक दर्जाचे काम करण्याची संधी, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा मार्गदर्शन सत्रे आणि इंटर्नशिपच्या संधी असे अनेक फायदे होणार आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!