“कॅन्सर डायग्नोस्टिक मोबाईल व्हॅन” हे कर्करोगाविरोधातील लढ्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल – उदय सामंत
रत्नागिरी : सार्वजनिक आरोग्य विभाग, रत्नागिरी यांच्या माध्यमातूनकर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेसाठी कॅन्सर डायग्नोस्टिक मोबाईल व्हॅन चे लोकार्पण राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांच्या हस्ते करण्यात आले. ही मोहीम केवळ तपासणीपुरती मर्यादित नसून कर्करोग जनजागृती आणि लवकर निदान या दोन्ही दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. कर्करोगाची भीती या माध्यमातून कमी होईल व उपचार होणासाठी मदत होईल, असे यावेळी उदय सामंत यांनी म्हटले.
- या व्हॅनमधून खालील सेवा उपलब्ध असतीलः
स्तन, गर्भाशय, तोंड व इतर कर्करोग प्रकारांची प्राथमिक तपासणी
अत्याधुनिक डायग्नोस्टिक तंत्रज्ञानाची मदत
आरोग्य विषयक मार्गदर्शन व सल्ला
लवकर निदानामुळे वेळेत उपचार मिळण्यास मदत
ग्रामीण व दूरदराज भागांमध्ये पोहोचून, जेथे आरोग्यसेवा मर्यादित आहे तिथे ही व्हॅन आशेचा किरण ठरेल. कर्करोगाविषयी भीती न बाळगता, लवकर निदान व वेळेवर उपचार हा योग्य मार्ग आहे. ही व्हॅन म्हणजे केवळ वाहन नाही. तर एक चालती बोलती जीवनदायी सुविधा आहे. आपल्या समाजात आरोग्यविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि प्रत्येकाला आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी, हा या उपक्रमामागचा खरा उद्देश असल्याचे प्रतिपादन उदय सामंत यांनी यावेळी केले.