महाराष्ट्रकोंकण

उद्योग मंत्र्यांनी आढावा बैठक घेवून देखील लोटे एमआयडीसीत अपघाताची मालिका सुरूच.

रत्नागिरी  : लोटे एमआयडीसी परिसरात अपघातांचे सत्र थांबताना दिसत नाही रविवारीच राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी लोटे येथील उद्योग भवनात आढावा बैठक घेऊन सुरक्षा उपाय योजनांचा फेरविचार करत उद्योजकांना सतर्क राहाण्याचे आवाहन केले होते. मात्र या बैठकीनंतर अवघ्या २४ तासांतच योजना इंटरमिजिएट ऑरगॅनिक कंपनीत आग लागल्याची घटना घडली असून, त्यामुळे औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

सोमवारी पहाटे ही घटना घडली असून, कंपनीच्या आतील भागात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा झाथमिक अंदाज आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि काही तासांच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात आली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र के पनीच्या यंत्रसामग्रीचे नांहे नुकसान झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!