महाराष्ट्रकोंकण

तालुक्यात अखंडीत व सुरळीत वीजपुरवठा राहावा यासाठी उपाययोजनांचा सखोल अहवाल सादर करा – आमदार किरण सामंत यांचे महावितरणला निर्देश

राजापूर : मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्हयात अनेक भागात विजपुरवठ्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र भविष्यात राजापूर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात पावसाळयात अखंडीतपणे विजपुरवठा कसा सुरळीतपणे सुरू ठेवता येईल यासाठीचे नियोजन आत्तापासून करा. त्यासाठी आवश्यक साधनसामुग्री व करावयाच्या उपाययोजनांचा विस्तृत अहवाल आपल्याला द्या अशा सुचना आमदार किरण सामंत यांनी महावितरणच्या अधिकान्यांना दिल्या. विद्युत पुरवठ्याच्या एकूणच नवीन व सुधारणात्मक कामांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांच्या माध्यमातुन पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या पुढाकाराने आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून देताना तालुक्यातील विज यंत्रणा अधिक भक्कम करण्यावर व खंडीत विजपुरवठयाचा प्रश्न कायमस्वरूपी कसा निकाली काढता येईल यावर आपला भर रहाणार असल्याचेही आ. सामंत यांनी यावेळी नमुद केले. पावसाळ्यात विजपुरवठा खंडीत झाल्यानंतर अपुरा कर्मचारी वर्ग व अन्य अडचणीतून महावितरणचे अधिकारी व कर्मचारी काम करत आहेत याची आपणाला कल्पना आहे. पण विजपुरवठा खंडीत झाल्यानंतर ग्राहक, लोकप्रतिनिधी, समाजसेवक यांचे फोन येत असतील ते उचलून निदान जी काही अडचण आहे. लाईट कधी येईल याची माहिती अधिकान्यांनी द्यावी अशा सक्त सूचनाही आ. सामंत यांनी यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

    राजापूर शहरासह ग्रामीण भागातील विजपुरवठा मान्सूनपूर्व पावसातच कोलमडला आहे. अनेक भागात वारंवार विजपुरवठा खंडीत होत असून महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून योग्य प्रकारे माहिती दिली जात नसल्याच्या जनतेच्या तक्रारी होत्या. या प्रश्नी भाजपा युवा कार्यकर्ते अरविंद लांजेकर यांनी आ. सामंत यांच्याशी चर्चा करून एका बैठकीचे आयोजन करून राजापूर करांच्या विज समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी केली होती. त्यावर आ. सामंत यांनी शुक्रवारी राजापुरात शासकिय विश्रामगृहात महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आ. सामंत यांनी शहरासह ग्रामीण भागातील विज समस्येबाबत माहिती घेतली. यावेळी पोल, व ट्रान्स्फरमर बदलणे, लाईन मन नेमणे यांसह अन्य तक्रारी पुढे आल्या. तर शहरातील भूमिगत वीजवाहिन्यांचा मुद्दाही मांडण्यात आला. यावेळी अनेकांनी आपले प्रश्न मांडले. यानंतर आ. सामंत यांनी अधिकान्यांना जी कामे आता तातडीने करणे शाक्य आहेत ती करण्याच्या सुचना दिल्या. तर भविष्यात अशा प्रकारे विजेचा प्रश्न कायमस्वरूपी कशा पध्दतीने निकाली काढता येईल यासाठीचे नियोजन करून अहवाल द्या, आपण त्यासाठी शासनाकडून निधी आणून ती कामे मार्गी लावू अशा सुचना दिल्या. तर ग्राहकांशी सौजन्याने वागा फोन उचलून योग्य माहिती द्या अशाही सूचना दिल्या. या बैठकीला महावितरणचे अधिकारी क्षिरसागर यांसह सर्व विभागाचे अधिकारी, राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, भाजपा जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशफाक हाजू. शिवसेना तालुका प्रमुख दीपक नागले, राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष संजय ओगले, प्रकाश कुवळेकर, शहन प्रमुख सौरभ खडपे, अरवीद लजिकर, पाचल उपसरंच किशोर नारकर, उमेश पराडकर, माजी जि. प. सदस्य आबा आडीवरेकर आदीसह शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते व विजग्राहक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!