कोरोना रुग्णाची तल्लफ भागविण्यासाठी चक्क टरबूजातून पाठविली दारू आणि गुटखा..
धक्कादायक म्हणावा असा प्रकार यवतमाळमध्ये उघड..
यवतमाळ,दि.१६ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कोरोना उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची तलफ भागविण्यासाठी रुग्णांच्याच नातलगांनी टरबूज फोडून त्याच्या आत गुटका पार्सल पाठविण्याचा प्रकार उघडकीस आला. तर काही नातलगांनी विदेशी मद्यसुद्धा पुरविण्याचा प्रयत्न काल गुरुवारी केला होता. मात्र, वैद्यकीय महाविद्यालयात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षक आणि डॉक्टर यांच्या सतर्कमुळे हा प्रयत्न हाणून पाडला.
टरबूज फोडून त्याच्या आत खर्रा पार्सल पाठवण्याचा प्रकार देखील उघडकीस आला आहे. तर काही नातलगांनी विदेशी मद्यसुद्धा पाठवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शौकिनांची तल्लफ भागवण्याचा रुग्णांच्या नातलगांचा प्रयत्न रुग्णालय प्रशासनाने हाणून पाडला. वैद्यकीय महाविद्यालयात तैनात सुरक्षा रक्षक आणि डॉक्टर यांच्या सतर्कनेने हा प्रकार उघडकीस आला.
मात्र या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली असून, व्यसनासाठी लोक काय काय करतात हे देखील उघडकीस आले आहे. दरम्यान येथील कोरोना सेंटर्स ची सुरक्षा तपासणी अधिक कडक करण्यात आली आहे