महाराष्ट्रक्राइम

आशाराणी भोसले आत्महत्या प्रकरण, सदरील घटनेकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करा : उपसभापती नीलम गोऱ्हे

सोलापूर  : सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली एमआयडीसी तालुका मोहोळ येथे राहणाऱ्या २६ वर्षीय आशाराणी भोसले यांनी दिनांक ३ जून २०२५ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्याच दरम्यान एका अल्पवयीन मुलीला तिच्या रंगावरून वडिलांनी सातत्याने बोलल्यामुळे तिने आत्महत्या केल्याची घटना घडली.तसेच संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळयाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या आणि उपसभापती नीलम ताई गोऱ्हे या सोलापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना.

त्यावेळी सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी जंगम, सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे,जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील,सोलापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार या सर्व अधिकाऱ्यासोबत नीलम गोऱ्हे यांनी बैठक घेतली.

या बैठकीनंतर नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,आशाराणी भोसले यांच्यावर होणार्‍या अत्याचाराबाबत त्यांनी सुरुवातीच्या काळात पोलिसांकडे तक्रार केली.त्यावेळी पोलिसांनी तडजोड केली.त्याच दरम्यान त्या महिलेचा छळ झाला आणि तिला आत्महत्येचे पाऊल उचलावे लागल,त्यामुळे आशाराणीच्या छळाकडे दुर्लक्ष करणाऱ्या त्या पोलिसांची चौकशी करा,असे निर्देश ग्रामीण पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की,सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील तरुणी,महिला वरील अन्याय अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी भरोसा सेल, दक्षता समितीच्या माध्यमांतून वेळोवेळी महिलांशी संवाद साधण्यात यावा,जेणेकरून अशा अन्याय अत्याचाराच्या घटना सुरुवातीच्या कालावधीत समजण्यास मदत होईल.त्यातून पीडित तरुणी किंवा महिलेला न्याय देता येईल,असे निर्देश पोलिस अधिकार्‍यांना दिले आहे.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, राज्यभरातील तरुणी आणि महिलांवरील अन्याय अत्याचार रोखण्यासाठी सुरुवातीला पिडीतेने आपल्या आसपासच्या व्यक्तीला आपल्यासोबत घडणार्‍या घटनेबाबत सांगितले पाहिजे.तरच अशा घटना रोखण्यात आपल्याला यश येईल आणि महिलांच्या प्रश्नावर समाजातील प्रत्येक घटकांने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या प्रशासनाच्या तयारी बाबत नीलम गोऱ्हे यांनी आढावा देखील घेतला.त्याबाबत बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,पंढरपूर मुख्य बस स्थानकात प्रचंड अस्वच्छता आणि कचऱ्याचे साम्राज्य असल्याची माहीती समोर आली आहे.तसेच बस स्थानक आणि आजूबाजूच्या परिसरात मोकाट जनावरांचा वावराबाबत नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन उपायोजना कराव्यात,त्याबाबत एस.टी विभागाचे नियंत्रक अमोल गोंजारी यांना निर्देश देण्यात आले.

त्याचबरोबर नदी घाटातील पाणी वाळवंटातील खड्ड्यांमध्ये साचून होणाऱ्या संभाव्य अपघातांची शक्यता लक्षात घेऊन सदरचे खड्डे क्षेत्र प्रतिबंधित करून त्या ठिकाणी धोक्याचे फलक तातडीने लावण्याबाबत संबधीत अधिकार्‍यांना लवकर लवकर काम करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!