महाराष्ट्र
संचारबंदीच्या सात दिवसांनी रुग्णसंख्येत घट होण्यास सुरुवात होईल -डॉ. तात्याराव लहाने
मुंबई,दि.१७:महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरुच आहे. कोरोनाबाधितांची संख्या दररोज नवनवे उच्चांक गाठत आहे. त्यामुळे राज्य सरकारने १५ दिवसांची संचारबंदी लागू केली. परंतु मागील दोन-तीन दिवसांत कोरोनाबाधितांची वाढतीच आहे. मात्र संचारबंदीच्या सात दिवसांनी रुग्णसंख्येत घट होण्यास सुरुवात होईल, असा विश्वास असा विश्वास वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.तात्याराव लहाने यांनी व्यक्त केला आहे





