महाराष्ट्रकोंकणक्राइम

रत्नागिरीत कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या

रत्नागिरी : अलिकडे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे अशीच एक दुर्देवी आत्महत्या रत्नागिरी शहरात झाली आहे. 38 वर्षाच्या तरुणाने घरात बेडरूममध्ये गळफास लावून आपले जीवन संपवल आहे. विवेकानंद विलास सावंत वय ३८ वर्ष, कुवारबाव रत्नागिरी असे या तरुणाचे नाव आहे. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी कार्यालयात कामाला असलेले विवेकानंद यांनी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू झालेले विवेकानंद सावंत यांची पत्नी हिला डॉक्टरांनी उपचार चालू असल्याने कोणताही ताण-तणाव न घेता आराम करण्याचा सल्ला दिला होता. अशातच विवेकानंद व त्यांची पत्नी या दोघांमध्येही अधुन मधुन वादविवाद होत होते. दिनांक ०८ जून रोजी रोजी रात्री ८.०० वा .च्या

दरम्याने घरगुती वाद झाला. या वादातून चिडलेल्या विवेकानंद यांनी अचानक त्यांच्या पत्नीला घराबाहेर काढत दार बंद करून घेतले. या घटनेनंतर तात्काळ या घटनेची माहिती ११२ या नियंत्रण कक्षावर देऊन कॉल करून पोलीसांना देण्यात आली व पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेत सोसायटीमधील लोकांच्या मदतीने दरवाजा उघडुन घरामध्ये प्रवेश केल्यावर आतलं भयानक दृश्य पाहून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. मृत्यू झालेले विवेकानंद यांनी बेडरूमधील फॅनला दुपट्टा स्वतःच्या गळ्यात गुंडाळून गळफास घेतल्याचे दृश्य पाहायला मिळालं. हा सगळा धक्कादाय प्रकार रात्री १०.३०. सुमारास समोर आला. त्यांची कोणतीही हालचाल होत नव्हती त्यांना रुग्णालयात नेण्यात करण्यात आले मात्र त्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. विवेकानंद सावंत हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथील आहेत. ते कोकण रेल्वे प्रशासनात सेवेत होते. यापूर्वी स्टेशन मास्तर असलेले विवेकानंद हे नुकतेच कोकण रेल्वेच्या रत्नागिरी कार्यालयात ऑफिसर म्हणून कार्यरत होते. विवेकानंद विलास सावंत यांच्या झालेल्या दुर्देवी मृत्यूमुळे रत्नागिरी शहर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचा मित्रपरिवार यांना तसेच कोकण रेल्वेतील कर्मचाऱ्यांनाही या घटनेचे वृत्त कळताच मोठा धक्का बसला आहे. या सगळ्या दुर्देवी घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे या घटनेचा नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आले आहे. अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे गायकवाड करत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!