स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा निर्णय राज्यस्तरीय समन्वय समिती करणार; स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करा – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील महायुतीचे धोरण निश्चित करण्यासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती आहे. ही समिती जो निर्णय घेईल तो अंमलात येणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील नेते युती संदर्भात काही बोलले तरी त्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे समन्वय समितीतील शिवसेनेचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. विविध शासकीय योजनांविषयीचा आढावा घेतल्यानंतर मंत्री सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रत्नागिरी शहरातील मोकाट गुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी एका खासगी संस्थेवर चर्चा झघली आहे. त्यांच्या सहकार्याने रत्नागिरीतील पायलट प्रकल्प राबविला जाणार आहे.
तो यशस्वी झाला तर अन्य शहरांमध्येही त्याची अंमलबजावणी केली जाईल. तत्पूर्वी रत्नागिरी शहरात फिरणाऱ्या मोकाट गुरांपैकी अनेक गुरांचे मालक आहेत. त्यांचाही शोध पालिकेच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. त्यांच्याशी संवाद साधून ती गुरे रस्त्यावर फिरणार नाहीत, याची काळजी घ्या अशा सूचना केल्या जातील. तसे झाले तर निम्मी गुरे रस्त्यावरून कमी होतील, परंतु त्या मालकांनी ऐकले नाही तर गुन्हा त्यांच्यावर दाखल करता येवू शकतो. पालिकेमार्फत गुरांच्या मालकांची यादी तयार केली जाणार आहे. त्याबरोबरच मोकाट गुरांवर काम करणाऱ्या संस्थांशी येत्या रविवारी बैठक आयोजित केली आहे.