महाराष्ट्रमनोरंजनमुंबई

धक्कादायक! ‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे 42 व्या वर्षी आकस्मिक निधन !

मुंबई : मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी आली आहे. ‘कांटा लगा’ या गाण्यातून लोकप्रियता मिळवणारी प्रसिद्ध झालेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं निधन झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉस फेम शेफालीला हृदयविकाराचा झटका आला होता, तिला मृतावस्थेत मुंबईतील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (अंधेरी) येथे आणण्यात आलं होतं. शेफाली ४२ वर्षांची होती.

शेफालीच्या निधनाची बातमी सर्वात आधी पत्रकार विकी लालवानी यांनी शेअर केली होती. आता बिग बॉसचे स्पर्धक राजीव अडातिया, अली गोनी आणि मिका सिंग यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच शेफालीचा पती अभिनेता पराग त्यागी याचे रुग्णालयाबाहेरील व्हिडीओ समोर आले आहेत. इन्स्टंट बॉलीवूडने पराग त्यागीचा रुग्णालयाबाहेरील व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तो कारमध्ये बसून जाताना दिसतोय.

शेफालीला तिचा पती, अभिनेता पराग त्यागीने तातडीने रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. तिच्या मृत्यूची पुष्टी झाल्यानंतर, तिचा मृतदेह पोस्टमॉर्टम तपासणीसाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शेफालीच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे. शेफालीचं निधन झालं, यावर विश्वास नसल्याच्या कमेंट्स चाहते करत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करून तिला श्रद्धांजली वाहिली आहे.
दरम्यान, शेफालीला ‘कांटा लगा’ या गाण्यातून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. तिने अभिनेता पराग त्यागीशी लग्न केलं. पराग व शेफालीने ‘नच बलिए’ या डान्स रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता. तसेच शेफालीने सलमान खान, अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रा यांच्या ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात खास भूमिका केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!