महाराष्ट्रकोंकणमुंबईवाहतूक
वंदे भारत एक्सप्रेस 16 किंवा 20 डब्यांची चालवा; प्रवासी संघटनेची मागणी.

मुंबई : कोंकण मार्गावर धावणाऱ्या सीएसएमटी मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या फेऱ्यांना प्रवाशांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. सद्यस्थितीतील एक्सप्रेसचे ८ डबे प्रवाशांसाठी अपुरे पडत आहेत. प्रवाशांची वाढीव डब्यांची मोठी मागणी असतानाही अजूनही रेल्वे बोर्ड उदासीन आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत एक्सप्रेस १६ किंवा २० डब्यांची चालवावी, अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी रेल्वे बोर्डाला केली आहे.आलिशान वंदे भारत एक्सप्रेस कोकण मार्गावर सुरू झाल्यापासून सर्वच फेऱ्यांना प्रवाशांचा भर भरून प्रतिसाद लाभत आहे. सद्यस्थितीतील एक्सप्रेस ८ डब्यांची धावत आहे. ८ डबे अपुरे पडत असल्याने एक्सप्रेस १६ किंवा २० डब्यांची चालवण्यासाठी यापूर्वीपासूनच आग्रह धरण्यात आला आहे. मात्र तरीही रेल्वेबोर्डाने सकारात्मक निर्णय घेण्यास असमर्थता दर्शवली आहे.